पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 364 नव्या रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत.
मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 11 व ग्रामीण 3) तालुक्यातील 14, महाड पाच, कर्जत, अलिबाग व सुधागड प्रत्येकी दोन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (मनपा 222, ग्रामीण 41) तालुक्यात 263, अलिबाग 26, पेण व महाड प्रत्येकी 19, रोहा 16, उरण सात, कर्जत व खालापूर प्रत्येकी पाच, माणगाव दोन आणि सुधागड व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 48,038 आणि मृतांची संख्या 1228 झाली आहे. जिल्ह्यात 42,700 जण कोरोनामुक्त झाल्याने 4010 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper