Breaking News

ठरलं! रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर पूर्ण झाला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे.सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. बारामतीशी संघर्ष झाल्यानेच काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी म्हटले होते, मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून माढ्यातील उमेदवारी घोषित करण्यात आली नव्हती. भाजपकडून माढ्यासाठी रोहन देशमुख यांच्या नावाचाही विचार सुरू होता, मात्र संजय शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे माढ्याची लढत रंगतदार ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply