उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
अखिल कराडी समाज महाराष्ट्र ही संघटना कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून ही संघटना संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या संघटनेच्या 21व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कराडी समाजाची 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशन अखिल कराडी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव बंडा यांच्या हस्ते करण्यात आली. कोट गावचे आराध्य दैवत श्री राघोबादेव मंदिर, कोटनाका हा कार्यक्रम झाला. या वेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महादेव बंडा, कोषाध्यक्ष मधुकर भगत, महाराष्ट्र सचिव विलास पाटील, मुंबई उपाध्यक्ष संतोष माजगावकर, उपाध्यक्ष मनोहर पाटील, पनवेल अध्यक्ष सूरदास गोवारी, उरण अध्यक्ष रमण कासकर, उरण उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, बांधकाम सभापती गणेश पाटील, उपाध्यक्ष रमेश धुमाळ, चौल विभाग मेघशाम झावरे, श्रीकांत भोईर, दत्ताराम पाटील, शांताराम पाटील, सुनील पाटील (पाणजे),चौल विभाग अध्यक्ष अविनाश भगत, ठाणे विभाग अध्यक्ष विजय मोहिते, खजिनदार मधुकर भगत, सहखजिनदार प्रल्हाद कासकर, कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष योगेश गोवारी आणि कराडी समाजाचे बंधु व भगिनी आदी उपस्थित होते.