Breaking News

पनवेलमध्ये 154 नवे पॉझिटिव्ह

21 रुग्णांचा मृत्यू; 314 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.5) कोरोनाचे  154 नवीन रुग्ण आढळले असून 21 जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 121 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला व 255 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 33 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल व खारघर प्रत्येकी चार, पनवेल, कळंबोली, कामोठे प्रत्येकी तीन, खांदा कॉलनी दोन, तळोजा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 25 रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3200 झाली आहे. कामोठेमध्ये 27  रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4491  झाली आहे. खारघरमध्ये 37 रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 5402 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 16 रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 3769 झाली आहे. पनवेलमध्ये 11 रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3505 झाली आहे. तळोजामध्ये पाच रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 800 झाली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 20267 रुग्ण झाले असून 18047 रुग्ण बरे झाले आहेत. 1748 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 472 जणांचा मृत्यू झाला आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात 1,35,295 कुटुंबांतील  5,11,295 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 471 जणांना सर्दी, खोकला व ताप ही लक्षणे आढळली. त्यापैकी 324 जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 139 चाचणी नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

उरण तालुक्यात तीन नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत, तर एक रुग्णाचा मृत्यू व 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वशेणी, बाबदेव पाडा करंजा, उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर वशेणी येथे एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1911 झाली आहे. 1660 रुग्ण बरे झाले आहे. 154 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.   

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply