खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड सायन्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिबिंब आणि बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी (दि. 14) संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, ‘रुसा’चे उपसंचालक डॉ. विजय जोशी, मुंबई विद्यापीठाचे डॉ. अजय भांबरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, संजना कदम, महिला मोर्चाच्या बिना गोगरी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्हाटे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, विनायक कोळी, के. के. म्हात्रे, दीपक शिंदे, निशा सिंग, शिक्षक, विद्यार्थी हजर होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मार्गदर्शन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी (पुणे)तर्फे स्व. रावसाहेब शिंदे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.