अलिबाग : जिमाका
येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) दुपारी 3 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोपकर, खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जि. प. अध्यक्ष आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.