Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने शालांत परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच मुंबईच्या कन्नमवारग्राम विक्रोळी येथील कामगार कल्याण भवनात केला. या समारंभाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल शाखेचे विशेष सहायक अरविंद मोरे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक  कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, ठाणे विभाग कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर गवई, मानव संसाधन व्यवस्थापक प्रमोद सोनावणे, फॅशन अ‍ॅण्ड रिटेल पेन्टालूम आदित्य बिर्ला, कल्याण निरीक्षक संजय राणे, केंद्र संचालक गजेंद्र आहेर, प्रवीण सकट आदी उपस्थित होते. अरविंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करते ही अभिमानाची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर मिळतेच, सोबत इतरांनासुद्धा प्रेरणा मिळते.

गेल्या अर्ध्या शतकापासून जास्त काळ सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राबवित आहे. त्यात आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम नित्याने दरवर्षी करीत आहोत असे सांगून, माधवी सुर्वे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

प्रमोद सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात काय काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करून कठोर मेहनतीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात आकांक्षा विठ्ठल बर्गे (100%),  भूषण संजय बांगर (98.40%), अमनप्रीत कौर भूपिंदरसिंग (97.60%), श्रेया राजेंद्र शिंदे (96.20%), कल्लुकरां अथिरा लोन्नपण (94%), वेदांत विकास पाटील (93.54%) या गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे सन्मानपत्र व प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. या वेळी विद्यार्थी व पालकांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र आहेर यांनी केले; तर आभार संजय राणे यांनी मानले.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply