Breaking News

माथेरान आदिवासी वाड्यांच्या प्रश्नावर एकमत

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वन विभागाने पिढ्यान्पिढ्या वसलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, खावटी कर्ज आणि धान्य प्रस्ताव यांना मान्यता देणे आणि मनरेगामधून कामे मंजूर करणे आदी कामे वन विभागाकडून करून घेण्यासाठी आदिवासींच्या बैठकीत एकमत झाले. आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या आषाणेवाडीमध्ये परिसरातील आदिवासींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मंडळाचे राज्य अध्यक्ष मनोहर पादिर, कर्जत तालुका अध्यक्ष चाहू सराई, जे. के. पिरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेणचे माजी अध्यक्ष संजय सावळा, भगवान भगत, रमेश बांगारी, किरवली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष सांबरी, मोहन वारगडा, नारायण पिरकर, बाळू झुगरे, कैलास खडके, भालचंद्र सांबरी, माजी सरपंच देहू सांबरी, गणेश पारधी आदी उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक आदिवासी वाड्यांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्यात किरवली ते बेकरेवाडी वाड्यांच्या रस्त्यासाठी 3/2चा दावा करून त्यास वनविभागाची मान्यता मिळविणे यासाठी कामाचे नियोजन करण्यात आले. डोंगरपट्टीतील सर्व आदिवासी वाड्यांसाठी गावठाण आणि मसणवटा यांच्यासाठी जागा निश्चित करून देण्यासाठी वन विभागाला प्रस्ताव सादर करण्याबाबत आणि आदिवासी बांधवांना खावटी प्रस्ताव करण्यासाठी सर्वांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. मनरेगा योजनेंतर्गत भातचरे सपाटीकरण, शेत बांध दुरुस्ती, अंतर्गत योजना माहिती देणे व प्रस्ताव सादर करणे यावर चर्चा झाली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply