खालापूर : प्रतिनिधी – वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकडे शरिरसंबधाची मागणी करणार्या संजय खोत या अधिकार्याविरोधात पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे. महिलेला कारखान्याकडून वेतनवाढ व सर्व सोयी मिळवून देण्याच्या बदल्यात शरीरसंबंधाची मागणी केल्याची तक्रार पीडीत महिलेनी दिली आहे.
महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करुन तिचा विनयभंग केल्यामुळे संजय खोत विरोधात पीडीतेच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सपोनी शेखर लव्हे हे करीत आहेत.