नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) या स्वरूपात भरू शकतील. तसेच देयक भरल्याची पावतही सदर केंद्रांवर प्राप्त करून घेता येईल.
सिडकोच्या नळ जोडणीधारकांनी आपली देयके संबंधित नोडनुसार पुढे दिलेल्या केंद्रांवर भरावीत :- खारघर – सिडको कार्यालय, खारघर; कळंबोली/नावडे/तळोजा – सिडको कार्यालय, कळंबोली; कामोठे – पाणी पुरवठा कार्यालय, सेक्टर-6अ, कामोठे; पनवेल (पूर्व)/करंजाडे/काळुंद्रे – सिडको कार्यालय, पनवेल; पनवेल (पश्चिम) – सेक्टर-12, पाण्याची टाकी, पनवेल; द्रोणागिरी – सिडको कार्यालय, द्रोणागिरी; उलवे – सिडको कार्यालय, उलवे; हेटवणे/सीबीडी सेक्टर-21/22 – रायगड भवन, सीबीडी.