Breaking News

मजगाव येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील मजगाव येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत जिल्हा नियोजन मंडळाचे 16 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. या सरक्षक भिंतीचे उद्घाटन आमदार

महेंद्र दळवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझ्या मतदारसंघात विकास कामांसाठी मोठा निधी देत आहेत. जास्तीत जास्त निधी आणून मुरूड तालुक्यातील विकास कामे पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी या

वेळी दिली.

सरपंच पवित्रा चोगले, उपसरपंच प्रीतम पाटील, भाई सुर्वे, अमीत कोळी, अभिनव कोळी, गटविकास अधिकारी सुभाष वाणी, शाम पाटील, भरत बेलोसे,  मुख्याध्यापक म्हात्रे गुरुजी, संतोष बुलू यांच्यासह शिक्षक पालक, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply