Breaking News

खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात ; दोघांचा  मृत्यू, एक जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
शनिवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात घडले. यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.
पहिला अपघात पुण्याकडून मुंबईकडे जाणारा साखरेची पोती भरलेला ट्रक शनिवारी पहाटे खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथून जात असतांना तीव्र वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. ट्रक व साखरेने भरलेल्या पोत्यांखाली सापडल्याने ट्रकमधील एकाचा यात मृत्यू झाला. त्यानंतर अर्ध्या तासात आडोशी फुडपार्कजवळ मुंबईकडे जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. यातही एकाचा जागीच मृत्यू व एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यातील मृत व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार मिश्रा (वय 40, रा. उत्तरप्रदेश) असे असून, जखमी व्यक्तीचे नाव हिरालाल निषाद (वय 46, रा सुलतानपूर) आहे. तिसरा अपघात खंडाळा घाटात अमृतांजन पूल येथील वळणावर झाला. यात एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हे तिन्ही अपघात घडले.  
सदर अपघाताची खबर होताच बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, खोपोली अपघात मदतीसाठी सक्रिय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन उलटला ट्रक व साखरेची पोती बाजूला करून, मयत इसमास बाहेर काढले व मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणले. यातील मृतव्यक्ती साधारण 50 वर्षीय असून, त्याची  ओळख अद्याप पटलेली नाही. या संदर्भात खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply