पाली ः प्रतिनिधी
इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यांतील 2400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 32 कांस्य अशी एकूण 51 पदके जिंकून तृतीय चषक पटकाविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणारी किर्णाक्षी किशोर येवले हिने लौकिकास साजेसा खेळ करीत स्टॅडींग फाईट प्रकारात आणि तुंगल सेनी प्रकारात सुवर्णपदक मिळवले. अंशुल कांबळेने एक सुवर्ण व एक रौप्यपदक, श्रवण लावंडने दोन रौप्यपदके आणि यश चिकने व स्वयंम पाटील यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण इंडियन पिंच्याक सिल्याटचे अध्यक्ष किशोर येवले, डायरेक्टर जनरल मोहम्मद इक्बाल जनरल सेक्रेटरी मुफ्ती हमीद यासीन व खजिनदार इरफान भुट्टो यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्रप्रताप सिंग, खजिनदार मुकेश सोनवणे, अॅड पी. सी. पाटील, अॅड. विशाल सिंग, संजीव वरे यांनी अभिनंदन केले.