Breaking News

आर्यन मोडखरकरचे जलतरण स्पर्धेत सुयश

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष चषक 2019 जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने पाच स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. या यशाबद्दल आर्यनवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण नगरपालिकेने जलतरण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने 50 मी. बॅक्स्ट्रोकमध्ये प्रथम, 50 मी. फ्रीस्टाइल द्वितीय, 50 मी. बॅटरफ्लाय द्वितीय, तर 50-4 फ्रिस्टाईल रिलेमध्ये प्रथम, तसेच 50-4 मिडले रिले या सांघिक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यापूर्वीही अनेक स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. नुकत्याच उरण नगरपालिका जलतरण स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळविले होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply