नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या साथीचा आलेख आता हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाचे संकट फेब्रुवारी 2021पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. देशात कोरोनाच्या केसेस एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत, असेही या समितीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 75 लाखांपेक्षा जास्त असून, त्यापैकी 65 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मोदी सरकारने मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू केला नसता, तर देशभरात कोरोनामुळे 25 लाख लोकांचे प्राण गेले असते. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली, असे निरीक्षण या समितीने नोंदविले आहे.
Check Also
सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …