पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील ओवळे आणि पागोटे येथील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल मंडल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, चंद्रकांत घरत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपमहापौर जगदीश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, महेश कडू, अविनाश गाताडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा या कार्यक्रमात उरण भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ओवळे येथील राकेश सदाशिव गायकवाड यांची भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी ओवळे येथील काँग्रेसचे राकेश सदाशिव गायकवाड, संजय सदाशिव गायकवाड, रूपेश सुरेश गायकवाड, रतेश दिनानाथ गायकवाड, आदेश गायकवाड, विनायक गायकवाड, मंगेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, आशिष गायकवाड, अजय गायकवाड, मनीष गायकवाड, समीर गायकवाड, राजेश गायकवाड, समाधान गायकवाड, अक्षय गायकवाड, अतुल गायकवाड, हन्सी गायकवाड, प्रशांत घरत, प्रवीण वेलियात, सागर गायकवाड, सुदर्शन म्हात्रे, केतन दापोलकर, विकी भगत, किरण घरत, अरुण कडव, हर्ष पाटील, रोहिदास गायकवाड, देविदास गायकवाड, प्रसाद गायकवाड, आतिष थोरात, अजय म्हात्रे, सारंग गायकवाड, सुरेश गायकवाड, समीर पाटील, राहुल पवार, सुमित पवार, आदेश गायकवाड, संदेश गायकवाड, राजेश म्हसकर, महेश पवार, अमित चोरघे, निखील पवार, सुहास खतरे, किशोर म्हात्रे, रोशन गायकवाड, वीर मुंजाको, महेंद्र मुजाको, अमित, किरण सदावर्ते, राहुल पाटील, केवल म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, संदीप गायकवाड, विशाल मढवी, सुमित पाटील, चेतन मुंगाजी यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. त्याचप्रमाणे पागोटे येथील शेकापच्या ग्रामपंचायत सदस्य वनिता जगदीश पाटील, प्रदीप गोसावी पाटील, कामिनी किरण तांडेल, हर्षाली निलेश पाटील यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.