Breaking News

वृद्धाश्रम, आदिवाडी वाड्यांमध्ये फळवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नेरेपाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रमात फळेवाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांमध्ये फळांचे वाटप केले.
या उपक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षप्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष आप्पा भागित, युवा नेते शेखर शेळके, संतोष पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, खारघर उपाध्यक्ष शुभ पाटील, मयुर कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवा सप्ताह अंतर्गत नेरेपाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम तसेच वाजे, चेरिवली, वाजेपूर, तार टेप, हाल टेप, तळोजा मजकूर, वाकडी, केवाळे, हरिग्राम या आदिवासी वाड्या आणि सुकापूर येथील श्री हॉस्पिटलमध्ये फळवाटप करण्यात आले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply