एकाचा मृत्यू , 237 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 18) कोरोनाचे 133 नवीन रुग्ण आढळले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे तर 237 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 200 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 25 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 108 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल सेक्टर 5 पायोनियर आर्केड येथील व्यक्तींचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3495 झाली आहे. कामोठेमध्ये 31 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 5098 झाली आहे. खारघरमध्ये 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 5087 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 15 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4084 झाली आहे. पनवेलमध्ये 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3741 झाली आहे. तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 860 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 22365 रुग्ण झाले असून 20619 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.19 टक्के आहे. 1234 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 512 जणांचा मृत्यू झाला आहे.