पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होताना पहावयास मिळत असून, रविवारी (दि. 18) नव्या 175 रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 108 व ग्रामीण 25) तालुक्यातील 133, अलिबाग 11, उरण व पेण प्रत्येकी आठ, रोहा सहा, खालापूर पाच, कर्जत तीन आणि महाड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात एक आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,048 आणि मृतांची संख्या 1468 झाली आहे. जिल्ह्यात 48,260 जण कोरोनामुक्त झाल्याने 2320 विद्यमान रुग्ण आहेत.