Breaking News

विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जासईत सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘रयत‘चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) सत्कार करण्यात आला.  दहागाव विभागातर्फे विद्यालयातील नूतनीकरण केलेला मुख्याध्यापक कक्ष, अटल टिंकरिंग लॅब व पाणपोईचे उद्घाटन सोहळ्यात हा कार्यक्रम झाला.

शिष्यवृत्ती मिळलेल्या आदिती म्हात्रे, कृणाल मेटकरी, तेजस कांबळे तसेच एमटीएस परिक्षेत यशस्वी झालेल्या साक्षी व्हनमाने आणि प्रतिक्षा पाटील हिचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार करत पुढील वाटचाली करीता सदीच्छा दिल्या. दरम्यान, या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जासई विद्यालयातील अडी-अडचणी समजून घेऊन विद्यालयाच्या प्रांगणातील जुनी मोडकळीस आलेल्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी भरीव मदतीचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन अरुण जगे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील, जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या वेळी रयतचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, सल्लागार समिती सदस्य गोपीनाथ ठाकूर, ‘रयत’चे रायगड विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर, जासई विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य मधुशेठ पाटील, जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरुण घाग, उपप्राचार्य पी. पी. मोरे, सहाय्यक विभागीय अधिकारी एस. एस. फडतरे, रयत सेवक संघाचे अध्यक्ष नुरा शेख, माजी सरपंच रजनी घरत, अमृत ठाकूर, सुनील घरत, चंद्रकांत पाटील, वीर वाजेकर फुंडे कॉलेजचे प्राचार्य बी. टी. पवार, फुंडे हायस्कूलचे प्राचार्य मोहन पाटील, दापोली-पारगाव कॉलेजच्या प्राचार्य पुष्पलता ठाकूर, करंजा येथील शाळेचे मुख्याध्यापक ए. टी. पाटील, फुंडे हायस्कूलचे पर्यवेक्षक एस. जी. म्हात्रे, जासई विद्यालयाचे पर्यवेक्षक साळुंखे, जगदीश म्हात्रे, व्हॉईस चेअरमन श्री रामभाऊ घरत यांच्यासह दहा गाव स्कूल कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply