Breaking News

लोणेरे येथे भरदिवसा घरफोडी

साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना सोमवारी (दि. 16) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये डी विंग तिसर्‍या मजल्यावरील रूम नं.304 या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबतची फिर्याद अनिकेत प्रमोद घोसाळकर (वय 30) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांच्या माहितनुसार, चोरट्यांनी घरातील तीन लाख 63 हजार रुपये रोख रक्कम व दोन लाख रुपये किंमतीचा एक सोन्याचा हार, साडेतीन तोळ्यांचा राणीहार व एक सोन्याची सुमारे सहा ग्राम वजनाची अंगठी असा एकूण पाच लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची माहिती समजताच रोहा उपविभागीय अधिकारी माणगाव प्रभारी किरणकुमार सूर्यवंशी व गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात भादविं संहिता कलम 454,380प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकुष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काकतकर हे करीत आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply