सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास
दुबई : पंजाबविरूद्धच्या सामन्यात शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईविरूद्ध त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. याचसोबत IPLमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन पहिलावहिला खेळाडू ठरला.