नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीमध्ये अनलॉकनंतर सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्यास सुरुवात केली आहे. हवा आणि पाणी प्रदूषण पातळीत वाढ झाल्याने परिसरात त्याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर प्रदूषण करणार्या आठ कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई केली आहे. यातील चार कंपन्यांचे पाणी आणि वीज तोडून उत्पादन थांबविण्यात आले आहे, तर बाकीच्या चार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. पुढील काळात दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळेस विशेष पथकाच्या माध्यमातून प्रदूषणाचा सर्व्हे करीत कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper