पनवेल : वार्ताहर
नवरात्री म्हणजे देवी शक्तीचे विविध रूपे आणि आदिशक्तीची आराधना; म्हणूनच यानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्याचा उपक्रम पनवेलचे माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी साकारला आहे.
कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व व्यवयसायिक अशा विविध क्षेत्रात अपार कष्ट करून, कठीण परिस्थितीत आपल्या क्षेत्रात यशाचा ठसा उमटवणार्या प्रभाग क्रमांक 18 मधील अशा नवदुर्गांचा सन्मान विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या सहकार्यांच्या सोबत सन्मान मूर्तीच्या घरी जाऊन केला.
या वेळी बोलताना विक्रांत पाटील म्हणाले की माझा प्रभाग हे माझे कुटुंब असून यातील जिद्द आणि संघर्षाने कार्य करणार्या माता भगिनींचे कौतुक कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी माझे आद्य कर्तव्य समजतो. हा नारीशक्तीचा सन्मान नक्कीच समाजातील इतर महिला वर्गाला प्रेरणा देईल आणि या माध्यमातून जिद्दीने कार्य करत अनेक रणरागिणी आपल्या कार्याचा ठसा विविध क्षेत्रात उमटवतील असा मला विश्वास वाटतो. या सर्व माता-भगीनीच्या सुख-दुःखात त्यांचा भाऊ म्हणून मी कायमच त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहीन असे विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी या प्रसंगी म्हटले आहे.