Breaking News

पृथ्वी शॉ नर्व्हस 90 चा शिकार

मुंबई : प्रतिनिधी

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातीला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला आणि यात दिल्लीने 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ नर्व्हस 90चा शिकार ठरला. त्याला 99 धावांवर माघारी जावे लागले.

पृथ्वीने 55 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांनिशी 99 धावा केल्या, मात्र ल्युकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात झेल देऊन माघारी परतला. 19 वर्ष आणि 141 दिवसांच्या पृथ्वीला या एका धावेमुळे 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडता आला नाही. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणार्‍या खेळाडूच्या विक्रमाने त्याला हुलकावणी दिली.

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शत करण्याचा विक्रम मनीष पांडेच्या नावावर आहे. मनीषने 21 मे 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेक्कन चार्जर्सविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती. त्या वेळी तो 19 वर्ष 253 दिवसांचा होता. एक संधी हुकली असली तरी पृथ्वी अजूनही हा विक्रम मोडू शकतो. आयपीएलच्या इतिहासात एका धावेने शतक हुकणारा पृथ्वी हा तिसरा खेळाडू ठरला. याआधी सुरेश रैना आणि विराट कोहली 99 धावांवर समाधान मानावे लागले होते, पण रैना 99 धावांवर नाबाद राहिला होता. आणखी एक योगायोग असा की विराट कोहली आणि पृथ्वी शॉ यांना फिरोज शाह कोटला मैदानावरच 99 धावांवर माघारी परतावे लागले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply