Friday , September 29 2023
Breaking News

अलिबाग येथे रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त वतीने शुक्रवारी (दि. 20) जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील नेऊली येथील जिल्हा क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे.  या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.  युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात प्राविण्य मिळविणार्‍या युवक-युवतींना प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपातील बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती रायगडच्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वक्तृत्व स्पर्धांचा या महोत्सवात समावेश असणार आहे. याशिवाय शास्त्रीय वाद्यांच्या वादनाच्या स्पर्धाही युवा महोत्सवात होणार आहेत. महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील रायगड जिल्ह्यातील युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत. या महोत्सवासाठीच्या प्रवेशपत्रिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन निकम 8856093608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply