Breaking News

तोतरेपणाचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार; महाड तालुक्यातील घटना

महाड : प्रतिनिधी

घरकामाला ठेवलेल्या तरुणीच्या तोतरेपणाचा फायदा उठवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना महाड तालुक्यातील कुंभार्डे मोहल्यात घडली आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, आरोपी अद्यापही मोकाट आहे. याबाबत महाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुक्तार इस्माईल जोगिलकर (रा. कुंभार्डे) याने गावातील 23 वर्षीय गरीब मुलीला त्याच्या घरी घरकामाला ठेवून तिच्या तोतरेपणाचा फायदा घेत 1 मार्च ते 30 एप्रिलदरम्यान वारंवार बलात्कार केला. आरोपीने फिर्यादीच्या आईवरही असाच बलात्कार करेन आणि भावावर करणी करेन अशी धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केला. आरोपीचा शोध सुरू आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply