मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर, तर अमरावती व पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरचे आमदार अनिल सोले, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सदस्यत्वाची मुदत संपल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत निवड झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या पाचही जागांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.