नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचे बळ आणखी वाढले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आठ, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडला गेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (दि. 2) शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. इतिहासात पहिल्यांदाच भाजपची राज्यसभेत स्थिती इतकी मजबूत झाली आहे. राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपत आहे. यापैकी तीन भाजप, चार सप आणि दोन बसप आणि एक काँग्रेस खासदार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी ब्रिज लाल, नीरज शेखर, हरिद्वार दूबे, गीता शाक्य, बीएल वर्मा, सीमा द्विवेदी, सपचे रामगोपाल यादव आणि बसपचे रामजी गौतम बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …