पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप अनुसूचित जाती मोर्चा, कामोठे शहराध्यक्ष प्रमोद रायबोले (53) यांचे गुरुवारी (दि. 29) आकस्मित निधन झाले होते. त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवारी (दि. 1) सकाळी त्यांच्या निवासस्थानी, श्रीगंगा गृहनिर्माण संस्था, सेक्टर 18, कामोठे याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या वेळी बौध्दाचार्य काळेबाग गुरुजी यांच्या हस्ते बुध्दवंदना घेऊन धार्मिकविधी झाला. नगरसेवक विकास घरत यांनी रायबोले यांच्या कार्याची माहिती देत भाजपाच्या वतीने आदरांजली वाहिली. तसेच भाजप अनुसूचित मोर्चा, रायगडचे चिटणीस श्याम साळवी यांनी रायबोले यांच्या धाडसीवृत्तीविषयी माहिती देत समाजाचा एक निडर कार्यकर्ता हरपल्याचे सांगितले.
या वेळी अशोक भिंगारदिवे, वालचंद रायबोले, आशिष कदम, नामदेव शिर्के, कांबळे साहेब, किरण गायकवाड, हरिश्चंद्र रायबोले आणि संदिप नेटकर आदिंनी दिवंगत प्रमोद रायबोले यांच्या जीवनावर बोलत आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास रायबोले कुटूंबाचे नातेवाइक, मित्रमंडळी आणि कामाठेमधील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.