Breaking News

पनवेल महानगरपालिकेत बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाच वर्षाखालील 47 हजार 606 बालकांना रविवारी संपूर्ण दिवसभरात पल्स पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागातर्फे शहरात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.

तसेच 2 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत उर्वरित बालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेत घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 401 पथके सज्ज आहेत. महानगरपालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी 347 स्थायी बुथ तसेच रेल्वे स्टेशन, डेपो, टोल नाके या ठिकाणी 142 अस्थायी बुथ तसेच दगडखाणी, उड्डाण पूल, रेल्वेलगतच्या झोपड्यांमधी लसीकरणासाठी 51 मोबाइल बुथ अशा प्रकारे विविध ठिकाणी एकूण 540 लसीकरण बुथ स्थापन करण्यात आले. साधारणत: पाच वर्षांखालील 70 हजार 426 लाभार्थी बालके नजरे समोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. कोविडच्या काळात हि पल्स पोलिओ लसीकरण मोहिम होत असल्याने व लहान बालकांना लसीकरण केले जात असल्याने सर्व बुथवर कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षेविषयक बाबींचे पालन केले जात होते. तशा प्रकारच्या काटेकोर कार्यवाहीच्या सुचना बुथवर कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवक यांना आरोग्य विभागातर्फे देण्यात आले.

मा. आयुक्त सुधाकर देशमुख, मा. उप आयुक्त सर, मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, रोगप्रतिकार अधिकारी मा. डॉ. पाटील, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, आरसी येच ऑफिसर डॉ. रेहाना मुजावर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतिल दत्त मंदीर येथील पोलिओ बुथला भेट दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply