Breaking News

बिलाच्या पावतीमध्ये हेराफेरी; सहाय्यक अभियंता निलंबित

पनवेल ः बातमीदार

महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीज बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे.त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत. पनवेल-1 उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी 7 लाख 76 हजारच्या 641 ग्राहकांच्या रिसिप्ट रद्द करून महावितरणच्या लाखो रुपयांचा अपहार केलेला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली होती. महावितरणकडे लाखो नागरिक आपले वीज बिल भरण्यासाठी येत असतात. नावडे येथील महावितरणच्या कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांच्या वीज बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून सिंह यांनी ते पैसे स्वतःसाठी वापरले. महावितरणकडे वीज बिलाचे पैसे भरून देखील दुसर्‍या महिन्यात ग्राहकाच्या बिलामध्ये मागील थकबाकी आल्याने ग्राहकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. या वेळी हा प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडून जवळपास सात लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी दिली. यात आणखी काही अधिकार्‍यांचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अद्याप गुन्हा दाखल नाही

सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे व त्यांच्यावर दोषारोप पत्र ठेवून अधीक्षक अभियंता वाशी मंडळ यांच्या नियंत्रणात चौकशी करण्यात येत आहे. या फसवणूक प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply