मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा या मागणीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मशाल मोर्चा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून, आमचा पक्ष शिवसंग्रामचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला असेल, अशी भूमिका शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीला मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण कारणीभूत आहेत. आम्ही अनेक वेळा मागणी करूनदेखील आरक्षणाचा प्रश्न त्यांनी गांभीर्याने घेतला नाही. परिणामी समाजाला सुप्रीम कोर्टातील स्थगितीला सामोरे जावे लागले, असेही मेटे म्हणाले.
Check Also
जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक
आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …