Breaking News

चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासगंगा

विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आली असून, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून येथील दोन विकासकामांचे उद्घाटन आणि एका कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, आनंद ढवळे, सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र गडकरी, हिरामण पाटील, स्वप्नील पाटील, राम फडके, मच्छिंद्र पाटील, भालचंद्र पाटील, निलेश पाटील, गोपीनाथ पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी चिखले आणि सांगडे येथे अनुक्रमे 15 आणि 10 लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचे उद्घाटन, तसेच सांगडे येथील स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply