रायगडात 108 नवे कोरोना रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात 108 नव्या कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 160 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण 9) तालुक्यातील 68, अलिबाग 10, पेण नऊ, रोहा चार, उरण, कर्जत व श्रीवर्धन प्रत्येकी तीन, खालापूर व माणगाव प्रत्येकी दोन आणि सुधागड, महाड, म्हसळा व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल व रोहा तालुक्यात दोन आणि खालापूर तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,325 आणि मृतांची संख्या 1563 झाली आहे. आतापर्यंत 51,541 जण कोरोनामुक्त झाल्याने 1221 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply