Breaking News

महामार्ग चौपदरीकरण कामाचा वेग सुस्साट..!

पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम आता पोलादपूरच्या सीमा ओलांडून आतपर्यंत होऊ लागले आहे. ठेकेदार कंपनी असलेल्या एलअ‍ॅण्डटीच्या कामाचा वेग पळस्पा ते कशेडीदरम्यानच्या कामामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

महाड तालुक्यातील वीरपासून पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगला येथील नियोजित बोगद्यापर्यंत एलअ‍ॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या कामाचा वेग कौतुकास्पद असल्याचे म्हणणे सकृतदर्शनी होऊ शकत असताना या कामांमध्ये

स्थानिक ठेकेदारांना परवडणार नाही एवढा अत्यल्प दर एलअ‍ॅण्डटी कंपनीकडून पोटठेकेदार म्हणून काम करताना दिला जात असल्याने कोणीही स्थानिक हे काम घेण्यास इच्छुक नसल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसून आले आहे. पार्ले येथील एका फार्महाऊस परिसरातील शेतकर्‍यांने भाडेतत्त्वावर जमीन घेऊन कलिंगडाचे पीक घेतल्यानंतर शेतातून बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविण्यासाठी एका ट्रॅक्टरमध्ये कलिंगड भरली असता या चौपदरीकरणातील रस्त्यालगतच्या गटारावर टाकलेल्या काँक्रीटच्या स्लॅबवरून हा ट्रॅक्टर जाताना स्लॅब खचल्याचे दिसून आले. सुदैवाने, हा ट्रॅक्टर बाहेर पडल्याने ट्रॅक्टरचालक बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

पोलादपूर शहरातील गोल्डन पॅलेस हॉटेल परिसरात तीनच दिवसांपूर्वी तासा-दोन तासांमध्ये अचानक काही डम्पर्समधून मातीचे ढीग टाकून भराव करण्यास सुरुवात झाल्याने या परिसरातील नागरिकांना त्यांच्या फ्लॅटपर्यंत मोटारसायकली आणि चारचाकी वाहने नेण्यास अडथळा झाल्याने कामाचा वेग नागरिकांना अडथळा निर्माण करणारा असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, पोलादपूर शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या दुकाने आणि टपर्‍यांची बांधकामे तोडण्याची कार्यवाही लोकसभा निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून यामागे मतदारांची नाराजी ओढवून घेण्यास कोणीही उमेदवार तयार नसल्याने प्रशासनावर भूसंपादन प्रक्रिया होऊनही दबाव निर्माण करण्यात आल्याची माहिती या वेळी प्राप्त झाली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply