Breaking News

माथेरानच्या राणीचा पर्यटन हंगाम सुरू

कर्जत : बातमीदार

पर्यटकांची लाडकी मिनिट्रेन गुरुवार (दि. 4)पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली, मात्र नेरळ-माथेरान प्रवासाला सहा तास लागल्याने मिनिट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांचा पुरता हिरमोड झाला. दुपारी सव्वा वाजता पोहचलेल्या मिनिट्रेनने माथेरान-अमन लॉजदरम्यान 79 प्रवासी पर्यटकांना सोबत घेऊन पर्यटन हंगामाची सुरुवात केली. कोविड अनलॉकमध्ये मिनिट्रेनची प्रवासी सेवा सुरू झाली असल्याने हिवाळी पर्यटन हंगामाला चालना मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी 15 जूननंतर पावसाळी सुटीची विश्रांती घेत असलेली मिनिट्रेन 15 ऑक्टोबरनंतर पुन्हा रूळावर येत असते, मात्र यंदा कोरोना महामारीचा संसर्ग होऊ नये यासाठी 17 मार्च रोजी मिनिट्रेन प्रवासी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. तब्बल आठ महिन्यांनंतर मिनिट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply