Breaking News

भाजपच्या ताकदीच्या जोरावर गीते विजयी होणार!

अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा विश्वास

मुरूड : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची कोकणात ताकद वाढली असून केंद्र व राज्य शासनाच्या कामावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे.विद्यमान सरकारने लोकांच्या विकासाच्या योजनांना प्राधान्य देत मूलभूत सुविधा लोकांना जास्तीत जास्त मिळाव्यात यासाठी कोकणातील विकासाला सुद्धा चालना दिली आहे. कोकणातील लोक भारतीय जनता पार्टीच्या कामावर खूश असून भाजपत प्रवेशकर्ते झाले आहेत. कोकणातील या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर गीते भरघोस मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.

लोकसभा मतदारसंघाचे मतदान नुकतेच झाले असून याबाबतची पहिली प्रतिक्रिया भाजपतर्फे व्यक्त करण्यात आल्याने गीते यांच्या विजयावर मोहिते यांनी शिक्कामोर्तब केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर अ‍ॅड. महेश मोहिते पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त करीत होते. या निवडणुकीबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच युतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग यांच्याशी सुसंवाद साधून केंद्र शासनाची ध्येय धोरणे पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून याचा चांगला परिणाम आम्हाला मतपेटीतून मिळेल, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक ही युवकांना खूप प्रमाणात भावला असून ही निवडणूक पूर्णपणे सकारात्मक अशा विकासाच्या मुद्द्यावर लढली गेल्याने व पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली युती सरकारच्या कामावर लोकांचा विश्वास असल्याने सुशिक्षित वर्गाने गीते यांना भरभरून मतदान केले असल्याचे प्रतिपादन मोहिते यांनी केले.

या मतदारसंघातील तरुणांची मते शिवसेनेचे उमेदवार गीते यांनाच मिळाली असून मताधिक्य वाढवण्यात या मतांचा टक्का खूप उपयोगी ठरणार असल्याचे या वेळी सांगितले.

केंद्राच्या व राज्य शासनाच्या भरीव कामगिरीमुळेच रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजप शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते याना मोठे मताधिक्य मिळून गीते निवडून येण्यास मदत होणार आहे. एकंदर या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने खासदारकीचे उमेदवार अनंत गीते निवडून येतील.

-अ‍ॅड. महेश मोहिते

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply