पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 122 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 21) तालुक्यातील 105, अलिबाग 15, पेण नऊ, उरण व खालापूर प्रत्येकी आठ, रोहा व महाड प्रत्येकी चार, माणगाव व सुधागड प्रत्येकी दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत झालेला रुग्ण महाड तालुक्यातील एक आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,483 आणि मृतांची संख्या 1564 झाली आहे. आतापर्यंत 51,661 जण कोरोनामुक्त झाल्याने 1258 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.