Breaking News

पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील ‘ती’ पाइपलाइन दुरुस्त

भाजपचे अमित जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाइपलाइनची गळती होत होती. यासंदर्भात भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करुन पाइपलाइन दुरुस्ती करुन गळती थांबविण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राधिकरणाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली.

पाइपलाइनच्या गळतीमुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्या पार्श्वभुमीवर अमित जाधव यांनी या ठिकाणाची अधिकार्‍यांसह पाहणी केली. व महाराष्ट्र प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना पाइपलाइन दुरुस्ती करुन गळती थांबविण्यासंदर्भात निवेदन दिले होते.

पाइपलाइनच्या दुरुस्तीमुळे दररोज वाया जाणारे पाणी वाचले तसेच पाइपलाइन नजिकच्या रिक्षा थांबाचा रिक्षा चालक व प्रवाशी यांना दैनंदिन त्रास सहन करावा लागायचा तो आता बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक अमित जाधव यांच्याकडे समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply