जिल्हा उपाध्यक्षपदी निलीमा भोसले यांची नियुक्ती
महाड : प्रतिनिधी
भाजपची रायगड जिल्हा महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर झाली असुन भाजपचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कै. राजेय भोसले यांच्या पत्नी निलीमा राजेय भोसले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी ही कार्यकारिणी जाहिर केली.
दरम्यान, गुरुवारी (दि. 5) माणगाव येथे भाजप महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, सरचिटणीस अश्विनी जिचकर, रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर उपस्थित होत्या. या वेळी मंजुषा कुद्रीमोती यांची जिल्हा सरचिटणीस, निलीमा राजेय भोसले यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, तर प्राजक्ता दळवी, दिपाली दाते, आराधना इंगावले, कल्पना जाधव यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या मेळाव्या दरम्यान, कोरोना महामारीत महाड कोविड सेंटरमध्ये उत्तम कार्य केलेल्या डॉ. जागृती कांबळे याचा नवदुर्गा म्हणून सत्कार करण्यात आला.