Breaking News

कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज  कृष्णाजी  भुजबळ यांच्या नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 मधील जनसंपर्क कार्यालयात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाऊ भुजबळ, महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश गायकवाड, रवींद्र ऑटोमोबाईलचे मालक रुग्वेद कांडपिळे, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज पणतू गोपिनाथ वसंत लोखंडे, भाजपचे बुथ अध्यक्ष प्रशांत फुलपगार, साई गणेश इंटरप्रायजेसचे राकेश भुजबळ, अभिजित भुवर, अजित लोंढे, क्रांती चितळे, किशोर शिंदे, तसेच अधिकारी व कामगार उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय कामगार चळवळीचे पहिले कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रज अधिकारी यांच्याशी लढा देवुन भारतीय कामगारांना हक्काची पहिली रविवारची सुटी 10 जुन 1890 ला मिळवुन दिली. ती रविवारची सुटी 132 वर्षाची झाली.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply