Breaking News

कोशिश फाऊंडेशनतर्फे पोस्टर, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी आहेत.
मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये तसेच 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे आणि 22 वर्षावरील अशा चार गटांमध्ये स्पर्धा होणार असून, ’ये दिवाली शांतीवाली’, ’ध्वनी प्रदूषण टाळा’ आणि ’वोकल फॉर लोकल’ हे विषय स्पर्धेसाठी आहेत. स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत आहे. दोन्ही स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पोस्टर स्पर्धेसाठी किमान ए थ्री आकाराचा पेपर वापरण्यात यावा, तर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओसोबत पत्त्याचा पुरावा असलेले एक कागदपत्र 7757000000 या क्रमांकावर पाठवावे तसेच अधिक माहितीसाठी याच क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply