Breaking News

ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतग्रस्त विल पुकोव्हस्की संघाबाहेर

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे ग्रहण लागले असतानाच आता यजमान संघाला दुखापतीचा फटका बसताना दिसत आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच दिवशी त्याला पुढील वैद्यकीय चाचणीसाठी व स्कॅनसाठी नेण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली. पुकोव्हस्की सामन्यातून बाहेर गेला असून, त्याच्या जागी मार्कस हॅरीसला संघात स्थान देण्यात आले आहे. मार्कस हॅरिस हा वॉर्नरसोबत चौथ्या सामन्यात सलामीला येणार आहे. 2018-2019मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 2-1 असे कसोटी मालिकेत पराभूत केले होते. या मालिकेत मार्कस हॅरिसला संधी देण्यात आली होती. चार सामन्यांत आणि आठ डावांमध्ये त्याला दोन वेळा अर्धशतक झळकावता आले होते. इतर वेळी तो 30 धावांपेक्षा जास्त खेळू शकलेला नव्हता. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याच्या खेळाचा ऑस्ट्रेलियन संघाला किती फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचा जम्बो ऑस्ट्रेलिया दौरा अखेर शेवटच्या टप्प्यात आला आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिका झाल्यानंतर आता कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गॅबावर खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल दिसण्याची शक्यता आहे. भारताचे काही विश्वासपात्र खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply