
पनवेल : रामप्रहर वृत्त
पाली देवद ग्रामपंचायत हद्दीत सुकापूर परिसरात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार्या विकासकामांचे भूमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीमधून करण्यात आलेल्या लहान मुलांच्या दफनभूमीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) करण्यात आले.
पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व पाठपुराव्यातून विविध विकासात्मक कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार पाली देवद ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुकापूर येथे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजमंदिर आणि गाढी नदी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सुकापूर येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून लहान मुलांची दफनभूमी बांधण्यात आली. त्याचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सरपंच दत्ताशेठ भगत, आलुराम केणी, बुवाशेठ भगत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, किशोर सुरते, विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, विश्वजीत पाटील, उदय म्हस्कर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, प्रकाश पोपेटा, हनुमान खुटले, आत्माराम पाटील, अनिल पोपेटा, पंकज पोपेटा, भरत म्हस्कर, आनंद म्हस्कर, विकी पोपेटा, मधुकर पोपेटा, महेंद्र पाटील, गुरूनाथ पाटील, प्रमोद भगत, बाळकृष्ण पाटील, रूपेश पाटील, मेनका खुटले, योगिता पाटील, कविता पोपेटा, मीना पाटील, हिराबाई केणी, निकिता पाटील, प्रतीक्षा म्हस्कर, प्राची जाधव,
प्रिया वाघमारे, ग्रामपंचायत प्रशासक कांबळे, ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.