Breaking News

अलिबागच्या गोशाळेत गायवासरांची पूजा

अलिबाग : प्रतिनिधी

वसुबारस या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या  खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी पार पडला.

गाय हेच आपलं धन आहे, ही शिकवण आपल्याला ऋषीमुनींपासून मिळाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाची सुरूवात ही वसुबारस म्हणजे गाय, वासरांच्या पूजेने होते.  सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या वतीने खानाव येथे मागील चार वर्षांपासून गोशाळा चालवली जाते. इथं गीर जातीच्या 27 मोठ्या गायी, एक वळू आणि 25 वासरे आहेत, मंडळाचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांनी दिली. या गोशाळेत गुरुवारी गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. तसेच दोन गर्भवती गायींचे ओटी भरण करण्यात आले. या गायींना फुलांनी सजवण्यात आले होते. त्यांची वाढी भरण्यात आल्यानंतर आरती करण्यात आली. उपस्थित महिलांनी खास गायीसाठी तयार केलेले डोहाळेगीत सादर केले. परिसरातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply