Breaking News

‘पंतप्रधान मोदींना पर्याय नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

योगगुरू बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी त्रियोग करावा, तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. रामदेव बाबा यांना देशात मोदी फॅक्टर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर कोट्यवधी लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. संपूर्ण देशाला हे माहीत आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे. जे काही करायचे आहे ते देशासाठी करायचे आहे. देवाच्या कृपेने त्यांना हे सर्व काही मिळाले आहे, असे उत्तर रामदेव बाबांनी दिले. लोकशाहीत सध्या सर्वत जास्त विश्वास कोणावर आहे असे विचारले असता रामदेव बाबा म्हणाले की, भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या 10 ते 20 वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असे दिसत नाही. तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर सतत होत असतो असे जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आले तेव्हा मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे, असे बाबा म्हणाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply