Thursday , March 23 2023
Breaking News

काँग्रेसला झटका; फेसबुकने 687 पेसेज, अकाऊंट हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराने जोर धरलेला असतानाच फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. फेसबुकवरील काँग्रेसशी संबंधित 687 पेसेज आणि अकाऊंट डिलिट केली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

काँग्रेसशी संबंधित काही फेसबुक पेज आणि अकाऊंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारित केली जात होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. निवडणूक काळात खोट्या बातम्या पसरविणारे अकाऊंट बंद करण्यात येणार असल्याचे फेसबुकने म्हटले होते. त्याचा पहिला फटका काँग्रेसला बसला आहे.

फेसबुकवर खोटे अकाऊंट बनवून युजर्सने स्वतःची खरी ओळख लपवली होती. हे लोक काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित लोकांशी संबंधितच होते. आमच्या तपासातून ते उघड झाले, असे फेसबुकचे सायबर स्पेस पॉलिसी प्रमुख नथानियल ग्लिकर यांनी सांगितले.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply