माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खेळाडूंना प्रोत्साहित
कामोठे : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे येथे मंगळवारी (दि.23) नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले. या वेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक दिलीप पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नवनाथ साबळे, आयोजनाची जबाबदारी असलेले मंदार पनवेलकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.