Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पनवेलकरांचा अभिमान पुरस्काराने सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे हे मानून नेहमी मदतीचा हात देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेलकरांचा अभिमान या पुरस्काराने मंगळवारी (दि. 17) सन्मानित करण्यात आले.
कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर गेली अनेक वर्षे जनतेच्या लहान-मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देत सतत माणसांमध्ये रमल्याचे सर्वांनी कायमच पाहिले आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही लोकनेते रामशेठ ठाकूर जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने मोठा होत नाही तर तो दानत आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पहिले जाते. निस्वार्थी जीवन जगणे, लोकांना मदत करणे, काय मिळाले आणि काय दिले याचा विचारदेखील न करणारे निरपेक्ष नेतृत्व म्हणजे रामशेठ ठाकूर होय. त्यांच्या नावाला सार्थ ठरणारे जीवन त्यांनी घडविले ही किमयाच म्हणावी लागेल. त्यांच्या नावाप्रमाणे संयम, दानशूर, मर्यादा रामासारख्या तर उपकारी, निस्वार्थीपणा, दायित्व शेठसारखे आहे. थोडक्यात लोकनेते रामशेठ ठाकूर एक अष्टपैलू असलेले नेतृत्व रायगड जिल्ह्याला लाभले.
कष्ट करून एवढे बलाढ्य साम्राज्य उभे करणे आणि लोकांना भरभरून देण्याची दानत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आहे.
आज सर्वकाही लोकनेते रामशेठ यांच्या पायाशी लोळण घालत आहे, पण म्हणून त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही. सदैव आपल्याकडून मदत कशी होईल याचाच त्यांनी विचार केला. लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम केले. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली.
कोरोना महामारीमध्ये आपल्या दानत व माणुसकीचे दर्शन घडविताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दीड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहीम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणेशोत्सव गोड करण्यासाठी 60 हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य अशी हरएक आवश्यक मदत त्यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली. महापूर असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे. त्यांचे कार्य समाजाला आदर्श आहे. त्यामुळेच त्यांना समाजात मान-सन्मान आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीत समाजातील सर्व घटकांची एक कुटुंब मानून काळजी घेतली व मदतही केली. त्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पनवेलकरांचा अभिमान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी हा सन्मान सोहळा झाला. या सोहळ्यास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुंद्रेकर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक, अरविंद पोतदार, संजय कदम, निलेश सोनावणे, अनिल भोळे, मयूर तांबडे, रवींद्र गायकवाड, अ‍ॅड. मनोहर सचदेव, ओमकार महाडिक, कैलास रक्ताटे, अनिल दुंद्रेकर, आनंद सुरते, उद्योजक रमण खुटले, आदेश पोतदार यांच्यासह राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार व सा. कोकण संध्या वृत्तपत्राचे संपादक दीपक महाडिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाडिक यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …

Leave a Reply